मेक इन इंडिया
|महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभनवी दिल्ली येथे झाला. या वेळी पप्रधानमंत्रीनि ‘मेक इन इंडिया’ ही केवळ एक संकल्पना नसून ती साकार करणे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. या प्रसंगी त्यांनी ‘मेकइनइंडियाडॉटकॉम’ नावाचे वेबपोर्टलदेखील सुरू केले. या पोर्टलच्या माध्यमातून गुंतवणूकदारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. पंतप्रधानांनी ‘मेक इन इंडिया’ योजना पंडित दीन दयाळ उपाध्याय यांना सर्मपित केली. पंतप्रधानांनी या वेळी एफडीआय अर्थ आपल्यासाठी फस्र्ट डेव्हलप इंडिया असा आहे, हेदेखील जाहीर केले.
.तसेच ई-क्षेत्रा, डिजिटल इंडिया आणि त्याच्याशी जुळलेल्या क्षेत्रांसह ‘लिंक वेस्ट’ नावाची नवी घोषणाही केली. लिंक वेस्ट अंतर्गत सरकार कचर्याच्या माध्यमातूनही विकासाच्या संधी शोधणार आहे. हे काम पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या कार्यासाठी देशातील उद्योगपतींनी पुढे यावे, असे आवाहन मोदींनी या वेळी केले. या व्यासपीठावरून बोलताना पंतप्रधानांनी पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगातील संधी शोधण्यासाठी देशातील उद्योगपतींना पुढे येण्याचे निमंत्रणही दिले. सध्याचे नियम किमान करून उद्योगक्षेत्राला मजबूत करण्याचा सरकार कसून प्रय▪करणार आहे. तसेच जगातील देशांना आज बाजारपेठ कोठे आहे, हे सांगण्याचीही गरज नाही. भारतात जगभरातील उद्योगपतींसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत, या विचाराला आणि मानसिकतेला संपूर्ण जगात पसरावयाचे आहे. देशातील उद्योगपतींनी सरकारवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आता देश आणि विदेशातील उद्योगपतींनी भारताच्या विकासात सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली. ‘मेक इन इंडिया’ हि योजना भारतासाठी किती लाभदायक ठरते हे येणारा काळाच सांगेल .