मेथी आणि वांग्याचं भरीत
|१) मोठं वांगं एक
२) मेथीची चिरलेली पानं दोन वाटया
३) थोडी कोथिंबीर
४) लसूणपाकळ्या पाच-सहा
५) मिरच्या चार-पाच
६) फोडणीचं साहित्य
७) फोडणीसाठी तेल
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) वांग्याला तेलाचा हात लावून ते सगळीकडं नीट भाजून घ्यावं . नंतर पातेल्याखाली झाकावं म्हणजे सालं पटकन निघतात .
२) सालं काढून मऊसर कुस्करून घ्यावं . लसूण व मिरच्यांचे तुकडे थोडे ठेचून घ्यावेत .
३) फोडणीत तो खरडा व मेथीची पानं घालून वाफ आणावी . पानं शिजल्यावर कुस्करलेलं वांगं व मीठ घालून परतावं . वरून कोथिंबीर पेरावी .