मेथी कोफ्ता करी
|कोफ्त्याकरता :-
१) मेथीची एक जुडी निवडून
२) दीड वाटी बेसन , ओवा दोन चमचे
३) खाण्याचा सोडा चिमुटभर
४) लाल तिखट , तेल
५) चवीनुसार मीठ .
करीसाठी :-
१) तीन मोठे कांदे
२) आलं-लसूण पेस्ट दीड चमचा
३) गोड दही अर्धी वाटी
४) एक टोमाटो बारीक चिरून
५) भाजलेलं खोबरं अर्धी वाटी
६) खसखस दोन चमचे
७) शक्यतो ताजा गरम मसाला दोन चमचे
८) छोटया वेलचीचे दाणे भरडून
९) दालचिनी पूड पाव चमचा
१०) पनीर किसून एक चमचा
११) धने-जिरे दोन चमचे
१२) हळद , कोथिंबीर , तेल
१३) लाल तिखट , बडीशेप
१४) चवीनुसार मीठ .
कृती :-
कोफ्ते :-
१) प्रथम मेथी बारीक चिरून बेसन , ओवा , तिखट , मीठ , सोडा इत्यादी एकत्र करून किंचित सैलसर पीठ भिजवावं .
२) हातावर गोल गोळे थापून तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे .
करी :-
१) कांदा बारीक चिरून किंचित भाजून घ्यावा . मग खोबरं , खसखस , दालचिनी , बडीशेप , गरम मसाल्यातल्या अर्ध्या वेलचीचे दाणे , धने-जिरे भाजून हे सर्व मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करावी .
२) तेलात किंचित हळद आणि उरलेला गरम मसाला टाकून मिक्सरमधली पेस्ट घालावी .
३) लालसर रंग झाला की टोमाटो , तिखट , दही टाकून परतावं . एक कप पाणी , मीठ टाकावं .
४) ग्रेव्ही तयार झाली की कोफ्ते टाकावेत . कोथिंबीर , किसलेलं पनीर व हवा असल्यास गरम मसाला अजून अर्धा चमचा टाकावा . गरम मसाला ताजा असणे महत्त्वाचे आहे .