मेथी-मकई क्रीम पनीर

साहित्य :-Methi Paneer Malai-2

१)      मेथीची फक्त पानं दोन वाटया

२)     मक्याचे दाणे (पांढरे) अर्धी वाटी

३)     पनीर तुकडे करून अर्धी ते एक वाटी

४)     क्रीम अर्धी वाटी

५)    कांदा किसून अर्धी वाटी

६)      आलं-लसूण पेस्ट दोन चमचे

७)    हळद , तिखट

८)     तेल , धने-जिरे पूड

९)      आमचूर दीड चमचा

१०)  गरम मसाला प्रत्येकी एक ते दीड चमचा . 

कृती :-

१)      मेथीची पानं धुवून घ्यावी .  निथळून लगेचच एक शिट्टी देऊन शिजवून घ्यावी . 

२)     वेगळं पाणी घालू नये .  शिजल्यावर मिक्सरमध्ये एकदाच फिरवावी .  मक्याचे दाणे थोडया पाण्यात मीठ टाकून शिजवून घ्यावेत . 

३)     दोन वाटया गरम पाण्यात हळद टाकून त्यात पनीरचे तुकडे टाकावेत आणि   दोन मिनीटानं काढावेत . 

४)     पनीरला पिवळसर रंग येईल .  थोडया तेलात किसलेला कांदा गुलाबी रंगावर परतावा .  त्यावर आलं-लसूण पेस्ट टाकून परतावं . 

५)    कांद्याचा रंग बदलला की मेथी टाकावी . (हळद वापरू नये .)

६)      मक्याचे दाणे , पनीर थोडंसं पाणी टाकून हलवावं .  मीठ , थोडं तिखट टाकावं . 

७)    उकळी आली की परत थोडं तिखट , धने-जिरे पूड , गरम मसाला आणि आमचूर टाकावं .  व्यास्थित हलवावं .  

८)     ही भाजी तशी पळीवाढीच असते .  वाढतेवेळी परत गरम करून क्रीम मिसळावं . 

९)      पराठे , नान , रोटी कशाबरोबरही खावी .  रंग अजून हिरवा हवा असेल तर मेथीबरोबर तिच्या निम्मी कोथिंबीर घ्यावी .