मेथी , मलई मटर

साहित्य :-methi-matar-malai

१)      एक कांदा बारीक चिरलेला

२)     एक वाटी मेथी बरीक चिरलेली

३)     दोन टोमाटो बारीक चिरलेले

४)     एक चमचा आले-लसूण पेस्ट

५)    एक-दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या

६)      एक वाटी उकडलेले हिरवे वाटाणे

७)    एक टेबल स्पून सफेद ग्रेव्ही

८)     एक टेबल स्पून लिंबाचा रस

९)      अर्धा चमचा गरम मसाला

१०)  अर्धा टेबल स्पून मावा

११)   अर्धा चमचा साखर , १ चमचा क्रीम

१२)  एक टी. स्पून तेल , अर्धा टी स्पून तूप

१३)  चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट , बारीक चिरलेल्या मिरच्या टाकून परतणे .  कांदा परतून घ्यावा . 

२)     कांदा मऊ झाल्यावर बारीक चिरलेली मेथी टाकून मंद गैसवर शिजवावे .

३)     मेथी शिजल्यावर वाटाणे व टोमाटो टाकून परतून थोडेसे पाणी टाकावे .  गरम मसाला , सफेद ग्रेव्ही टाकावी . 

४)     मीठ टाकून ढवळून घ्यावे .  मावा , साखर व एक चमचा क्रीम टाकावे .  लिंबाचा रस एक चमचा टाकावा . 

५)    सर्व चांगले मिक्स होऊ दयावे .  चिरलेली कोथिंबीर व वरून अर्धा टेबल स्पून तूप   टाकावे . मलई मटर टेस्टी लागते . 

One Comment

Leave a Reply to Kalika Nagarkar Dongre Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *