मेहंदी काढताना काही महत्त्वाच्या गोष्टी

Mehandi-Designसण, उत्सव आणि त्या माध्यमातून होणारे सेलिब्रेशन.. मेहंदीशिवाय अपूर्णच..! मेहंदी काढताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतात.

१) मेहंदींचे डिझाईन ढोबळ मानाने आधीच ठरवा. डिझायनरकडून मेहंदी काढणार असाल तर त्यांच्याशी आधीच संवाद साधा.

२) मेहंदी शक्यतो रात्रीच रेखाटा. जेणेकरून दिवसभरातली धांदल टाळता येईल.

३) मेहंदी काढताना प्रथम आउटलेट काढून घ्यावे. त्यानंतरच आतली नाजूक डिझाईन काढावे, जेणेकरून मेहंदी पसरट होणार नाही.

४) हातावरची मेहंदी काढताना शक्यता दोन्ही हातांना समांतर नक्षी निवडावी अथवा दोन्ही हातांची मिळून एक नक्षी पूर्ण होईल. अशा नक्षींचा प्रयोगही करता येईल.

५) मेहंदी काढून झाल्यानंतर साधारण १0 मिनिटांनी अर्धे लिंबू आणि चिमूटभर साखरेच्या रसाचे मिश्रण कापसाच्या बोळ्याने हातावर फिरवा.

६) मेहंदी हातावर वा पायावर किमान ७ ते ८ तास ठेवा, तरच मेहंदी खुलेल आणि जास्त काळ टिकेल.

७) मेहंदी लावल्यानंतर साधारण पाच तासाने हाताला गोडतेल लावावे.

८) मेहंदीचा रंग अधिक खुलावा म्हणून मेहंदी धुण्यापूर्वी गरम तव्यावर दोन- चार लवंगा टाकून त्याचा थोडासा धूर होऊ द्यावा. त्यावर मेहंदीचे हात धरावेत. त्यानंतर मेहंदी हलक्या हाताने काढून घ्यावी. त्यानंतरच ती पाण्याने धुवावी.

९) मेहंदी पाण्याने धुतल्यानंतर लगेचच साबण वा श्ॉम्पूने धुवू नका.

१0) पायाची मेहंदी काढताना ती बटबटीत वाटणार नाही याची काळजी घ्या, पैंजण, अँकलेटची स्टाईल याला मॅच होईल, असेच मेहंदीचे डिझाईन असू द्या