मेहनती बना पण वर्कोहोलिक नको.
|मल्टीनॅशनल कंपन्या सगळीकडे पसरलेल्या आहेत. प्रत्येकावर कामाचा ताण असतो, खासगी कंपन्या आपल्या कर्मचार्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा देत नाहीत. म्हणून लोक थोड्या वेळात जास्त काम करण्याचा प्रय▪करीत आहेत. तांत्रिक उपकरणे उदा. इंटरनेट, सेलफोन, लॅपटॉप हे सर्व आमच्या जीवनाचे अभिन्न अंग बनत चालले आहेत. आम्ही कुठेही गेलो तरी ही सर्व साधने आमच्याबरोबरच असतात. मेहनती व वर्कोहोलिक असण्यात फरक असतो. मेहनती लोक कामे वेळेत पूर्ण करतात. वर्कोहोलिक लोक कुठल्याही कामाला पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ घेतात. मेहनती लोक आपले कुठलेही काम चातरुयाने पूर्ण करून स्वत:साठी वेळ नक्कीच काढून घेतात पण वर्कोहोलिक लोक कामात इतके गुंतून जातात की त्यांना स्वत व कुटुंबीयासाठी बिल्कुल वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना आपली हौस व इच्छा बाजूला ठेवावी लागते. हे लोक एकाच वेळी बरेच काम आपल्या हाती घेऊन सर्व कामांना पूर्ण करण्याकडे लागलेले असतात, पण त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स घसरतो. साहजिकच त्यांची प्रतिष्ठा पणाला लागते. म्हणूनच मेहनती बना पण वर्कोहोलिक नको, कामात व्यस्त असाल तर दिनचर्या अशी बनवा की काही वेळ कुटुंबाला नक्कीच देता आला पाहिजे, स्वत: साठी वेळ काढा, व्यायाम करा, सुट्टी घेऊन फिरायला जा.