मैदा धिरडं
|१) एक वाटी मैदा
२) अर्धी वाटी तांदळाचं पीठ
३) एक चमचा तेल
४) अर्धा चमचा फ्रुट सॉल्ट
५) दोन वाटया पाणी
६) कसूरी मेथी एक मोठा चमचा
७) अर्धा चमचा जाडसर मिरपूड
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) फ्रुट सॉल्ट सोडून इतर गोष्टी एकत्र कराव्या . धिरडं करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा .
२) तवा तापला की नारळाची शेंडी किंवा चिंधीनं तव्याला तेल लावून घ्यावं .
३) एक चमचाभर पीठ घालून व ऐनवेळी फ्रुट सॉल्ट मिसळून पीठ तव्यावर पसरून किंचित तेल सोडून झाकण ठेवावं . चर्र आवाज आला की धिरडं उलटावं .
४) नीट उलटलं गेलं आणि जरा जाड वाटलं तर थोडं पाणी घाला . एकदा जमलं की तवाभर धिरडं करता येतं .