मोडाच्या मुगाची आमटी (२)

साहित्य :-moong-dal123

१)      एक वाटी मोड आलेले मूग

२)     एक वाटी दही , साखर

३)     एक चमचा आलं कीस

४)     एक मोठा चमचा बेसन

५)    फोडणीसाठी एक मोठा चमचा साजूक तूप

६)      अर्धा चमचा जिरं

७)    एक-दोन हिरव्या मिरच्या

८)     सात-आठ कढीलिंबाची पानं

९)      चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      तुपाची जिरं , मिरच्या घालून फोडणी करावी .  फोडणीत कढीलिंब , आलं    घालून मूग घाला . 

२)     मूग परतून पाणी घालून शिजवावे .  दही घुसळून त्यात बेसन कालवून       पाणी घालावं . 

३)     मूग शिजल्यावर हे ताक घालून मीठ , साखर घालावं आणि एक उकळी     येईपर्यंत ढवळावं .