मोडाच्या मुगाची आमटी

साहित्य :-moong bhaji1234

१)      एक वाटी मोड आलेले मूग

२)     पाव वाटी काजू

३)     अर्धी वाट ओलं खोबरं

४)     दोन-तीन मिरच्या

५)    चिमुटभर बडीशेप पूड

६)      अर्धा चमचा जिरंपूड

७)    गूळ , चिंचेचा कोळ

८)     फोडणीचं साहित्य

९)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      खोबरं लाल मिरच्या , चिंच वाटून घ्यावं .  हिंगाची फोडणी करून त्यात मूग , काजू परतावे व पाणी घालून शिजवावं . 

२)     बडीशेप , जिरं पूड , वाटण , हवं तसं पाणी घालून मीठ , गूळ घालून उकळावं .