मोदींचे भाषण सर्व शाळांमध्ये

modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षक दिनाच्या दिवशी देशातील सर्व शाळेत सक्तीच्या
भाषणाच्या प्रसारणासाठी शालेय शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.तसेच महाराष्ट्र राज्यातील 95 हजार शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये या भाषणाविषयी उत्सुकता आहे.

शिक्षकदिनी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण करण्याची ही पहिलीच घटना आहे. राज्यातील एक कोटी 90 लाख विद्यार्थ्यांना विविध रेडिओ, दूरचित्रवाहिनी आणि इंटरनेटच्या माध्यमातून हे भाषण ऐकविले जाणार आहे. मोदी यांचे भाषण प्रसारण करण्याबाबत सर्व शाळांना शिक्षण संचालनालयामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.

“राज्यातील बहुतांश शाळांमध्ये दृक-श्राव्य माध्यमे, इंटरनेट सुविधा आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे भाषण प्रसारित करण्यात अडचण येणार नाही. अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भाषण ऐकविण्याचा प्रयत्न केला जाईल. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना कळविले आहे.
आता पंतप्रधान मुलांना काय संदेश देतील हा उत्सुक्याचा भाग आहे.