मोबाइल म्हणजे काय ?
|नमस्कार मित्रांनो आज आपण Mobile बद्दल मूलभूत माहिती बघणार आहोत.
उदा. Mobile शब्दाचा अर्थ? एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज नेता येणारे म्हणजे काय तर अगदी सहज कुठे हलवता येणारे आणि माहितीची देवाण घेवाण करता येणारे उपकरण .
आज या उपकरणाला विविध नावाने संबोधले जाते जसे की –mobile phone, cellular phone, cell phone or cellphone, hand phone or handphone, mobile, cell तर काही वेळा फक्त phone. जगातील पहिला मोबाइल फोन कोणी बनवला तर मोटोरोला (Motorola) या कंपनीने 1973 मध्ये. त्याचे वजन होते तब्बल 2 किलो (Kg).
सविस्तर माहिती बघूयात :
1. Smartphone:
आता आपण जर ही माहिती आपल्या फोन वर वाचत असाल तर तो आहे स्मार्ट फोन. जो फोन जास्तीत जास्त संगणकाची कामे करण्यास समर्थ आहे, ज्यामध्ये इंटरनेट कनेक्शन आहे अशा फोन ला आपण स्मार्ट फोन म्हणू शकतो. आणि हो अश्या फोन मधून आपण विडिओ कॉलिंग पण करू शकतो बरका.
2.Feature phone:
हा एक मूलभूत फोन आहे. यामध्ये फक्त आपण फोन कॉल करू शकतो किंवा आलेले फोन उचलू शकतो. तसेच संदेश (Message) पाठवू शकतो. आजही काही खेडेगावात जेथे इंटरनेट नेटवर्क पोहोचलेले नाही तिथे असे Feature phone वापरले जातात.
