यावर विचार करा…..!

girl in tensionचांगले दिसण्यासाठी मेकअप, कपडे इ. अनेक गोष्टींवर आपण भरपूर लक्ष देतो. अनेक खर्चिक मार्गांचाही अवलंब करतो. मात्र, ह्या सर्व गोष्टी बाजूला सारून सतत हसतमुख राहण्याचा प्रयत्न केल्यास आपण निश्चितच चांगले दिसू शकू. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला अनेक ताण-तणावाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यावेळी होणारे दुःख, वेदना आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतात. कपाळावर आठ्या पडतात, चेहरा दुःखी-कष्टी, चिंतातूर झालेला वाटतो. आपण कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्या मनातला तणाव आपल्या चेहऱ्यावर दिसू लागतो. त्यासाठी नेहमी प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रत्येक गोष्टीचा थंड डोक्याने, सकारात्मक विचार करावा. ध्यानसाधनेचा अवलंब केल्यासही फायदा होऊ शकतो. स्वतःला वाचनात गुंतवून ठेवल्यास अशा प्रसंगांपासून दूर राहू शकतो.

3 Comments