रक्षाबंधनाची लगबग सुरु…..

    rakhi भाऊ-बहिणीच्या नात्यातील बंधन अधिक घट्ट करणारा ‘रक्षा बंधन’ हा सण उद्यावर येऊन ठेपल्याने राख्या खरेदीसाठी बहिणींची मोठ्या प्रमाणावर झुंबड उडाली आहे. नेहमीच्या पारंपारिक राख्यांना फाटा देत डायमंड, मोतीअसलेल्या राख्यांसह ब्रेसलेटला महिलांची अधिक पसंती आहे.

     श्रावण महिना मुळातच उत्सवांचा महिना म्हटला जातो. त्यातही रक्षाबंधनाची सर्वांनाच विशेष ओढ असते. दुकानदारही मग सुंदर, वेगवेगळ्या प्रकारातील राख्यांची दुकाने थाटतात. आकर्षक पद्धतीने स्टॉलवर ठेवलेल्या राख्यासर्वांचेच लक्ष वेधून घेतात.

      यंदा बाजारात डायमंड, मोती असलेल्याआकर्षक राख्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत; तसेच ब्रेसलेट राख्यांना मोठीमागणी आहे. बाजारात दहा रुपयांपासून पाचशे रुपये किमतीच्या राख्या विक्रीसउपलब्ध झाल्या आहेत. भैया-भाभी, रुद्राक्ष, म्युझिकल राखी आदी प्रकारच्याराख्या विक्रीस आल्या आहेत. पांरपरिक गोंड्यांच्या राख्यांना खूप महत्त्वअसते. यात स्वस्तिक, शंख, मोती, ओम यांसह देवी-देवतांचे छायाचित्र असलेल्याराख्यांचा समावेश आहे. बच्चेकपंनीसाठी छोटा भीम, फेरारी कार, कृष्णा यांसहम्युझिकल व लाइटच्या राख्या उपलब्ध आहेत.

     तमाम देशवासियांना रक्षा-बंधानानिमित्त “m4मराठी.com”च्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा!