रक्षाबंधन RakshaBandhan Information in Marathi

हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.
उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे.
या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून
भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात.
पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते,
तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.

इंद्राच्या राणीने आपल्या मनगटावर एक धागा बांधला होता.
ज्याच्या सामर्थ्याने वज्रानुसार राक्षसाचा पराभव केला.
तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पध्दत आहे.
राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वत:ला वाहून घेऊन
तिच्या रक्षणाची जबाबदारी स्वकारतो. राखी बंधनाच्या या सणातून मित्रत्व,
स्नेह व परस्पर प्रेम वृध्दिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.

राखीचा धागा हा देखील नुसताच सुताचा दोरा नसून ते एक शील,
स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे, सतत संयमी ठेवणारे पुर्षार्थाचे पवित्र बंधन आहे.
ह्या एवढयाशा धाग्याने कित्येक मने जुळून येतात.
त्यांना भावनांचा ओलावा मिळतो वं मन प्रफुल्लीत होते.
रक्षाबंधनाच्या सर्व भाऊ बहिणींना हार्दिक शुभेछा
आपली …………एक आठवण