रव्याची इडली

rava idali

 

साहित्य :-

१)      एक वाटी उडीद डाळ

२)     दोन वाटया इडली रवा

३)     अर्धा चमचा मेथी दाणे

४)     चवीला मीठ .

कृती :

१)      डाळ आणि रवा धुऊन वेगवेगळे भिजत घालावे .  दोन्हीत थोडे थोडे          मेथी दाणे घालावे .

२)     उडीद डाळ अगदी गुळगुळीत वाटावी .  डाळ वाटून होत आली की पाणी   निथळून रवा घालून वाटावी .

३)     त्यात मीठ घालून लागेल तसं पाणी घालून मोठया पातेल्यात झाकून उबेच्या जागी रात्रभर जवळजवळ अडीचपट फुगेपर्यंत ठेवा .

४)     सकाळी कुकरमध्ये पाणी उकळत ठेवा .  इडली पात्राच्या वाट्यांना तेलाचा हात लावून प्रत्येकात डावानं अर्धी वाटी भरेल एवढं पीठ घाला .

५)    पातेल्यातलं पीठ अजिबात न ढवळता , कडेकडेनं पीठ काढा .  म्हणजे फुग मोडणार नाही .  सात-आठ मिनिटात इडल्या उकडून होतील .