रांगोळी

rangoliभारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला फार महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाला व सणाला रांगोळी काढण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. उंबरठा, देवघर तसेच तुळशीजवळ रांगोळी काढली जाते. सध्याच्या काळात पर्यावरणविषयक, धार्मिक आणि सामाजिक रांगोळया काढल्या जातात. दिवाळी हा सण जवळ आल्याने महिलांना वेध लागतात ते रांगोळीचे.
सध्या प्लस्टिक डिझाईन व नळकांड्याचा वापर करून सुरेख नक्षी तयार होते. पूर्वी महिला हातानेच रांगोळी काढत. जसजसा विकास होत गेला तसा रांगोळी काढण्याच्या माध्यमातही बदल होत गेला. सध्याच्या परिस्थितीत पेन, चाळण्या, गाळणे, ठिपक्यांचे कागद, छापे आदी माध्यमांच्या साह्याने चांगली व आकर्षक रांगोळी काढता येत असल्याने महिला या माध्यमाला जास्त प्राधान्य देऊन रांगोळी काढली जाते. रांगोळीमध्ये ठिपक्यांची रांगोळी, संस्कार भारतीची रांगोळी, झेंडूच्या फु लांची काढलेली रांगोळी, खडूने काढलेली रांगोळी, हस्तकलेची रांगोळी, सरस्वतीची रांगोळी, ताटाभोवती इको फ्रेंडली काढलेली रांगोळी अशा विविध प्रकारच्या रांगोळय़ांची पद्धत रूढ झाली आहे. रांगोळीचे विविध प्रकार आढळतात, पण भारतात शक्यतो बिंदू, अर्धवतरुळ, सरळ रेषा, वतरुळ, केंद्रवर्धिनी, गोपद्म, शृंखला, चक्र, श्रीधर, ओंकार, स्वस्तिक, ध्वज, शंख, पद्म, गदा, कलश, शर शार्डग, सर्परेषा व देवासमोर काढल्या जाणार्‍या रांगोळय़ा नारळ, सरस्वती, कुयरी, बिल्वपत्र, कासव, कमळ, ज्ञानकमळ, चक्रव्यूह आदीचा समावेश होतो. आदी प्रकार भारतीय महिला मोठय़ा प्रमाणात वापरताना दिसतात.