राजमा
|१) राजमा एक वाटी
२) कांदे पाव किलो
३) टोमाटो एक मोठा
४) आलं एक इंच
५) लसूण पाच-सहा पाकळ्या
६) जिरं एक चमचा
७) तिखट एक चमचा
८) हळद , कोथिंबीर , तूप
९) चवीनुसार मीठ .
मसाल्यासाठी :-
१) धने एक टीस्पून
२) लवंगा तीन-चार
३) हिरवे वेलदोडे दोन
४) जिरं एक चमचा
५) शहाजिरं अर्धा चमचा .
कृती :-
१) आदल्या रात्री राजमा भिजत घालावा . भिजवताना पाण्यात खाण्याचा सोडा घालावा .
२) दुसऱ्या दिवशी त्यातलं सोड्याचं पाणी काढून टाकावं . राजमा जेवढा असेल त्याच्या दुप्पट पाणी घालून तो कुकरमध्ये शिजण्यास ठेवावा .
३) नेहमीपेक्षा दोन शिट्टया जास्त कराव्या . कांदा व टोमाटो बारीक चिरून घ्यावा . आलं-लसूण वाटून घ्या .
४) फ्रायिंग पैनमध्ये तूप गरम करून त्यात एक चमचा जिरं व कांदा फोडणीस टाकावा . कांदा चांगला परतून त्यावर वाटलेलं आलं-लसूण परतावं .
५) त्याला तूप सुटू लागलं की त्यात हळद , तिखट , थोडं चवीनुसार आमचूर घालावं . टोमाटोच्या फोडी किंवा ग्रेव्ही करून टाकावी .
६) नंतर राजमा घालून हवं असल्यास पाणी घालावं . मीठ घालून उकळी आणून वर कोथिंबीर घालावी .