राजस्थानी बेसनवाली भिंडी

साहित्य :-besan-wali-Bhindi-222x183

१)      भेंडी पाव किलो

२)     बेसन मोठे डाव

३)     धने-जिरे पूड व गरम मसाला प्रत्येकी एक चमचा

४)     बडीशेप दीड चमचा

५)    हळद , तिखट , आमचूर

६)      चमचाभर चारोळ्या

७)    तेल अर्धी वाटी

८)     चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      भेंडी स्वच्छ पुसून दोन्ही टोकं कापून मध्यभागी उभी चिरावी .

२)     चारोळ्या आणि अर्धा चमचा बडीशेप सोडून बाकी सर्व साहित्य कोरडच      एकत्र करावं व हा मसाला भेंडीत भरावा .   

३)     तेल गरम करून त्यात बडीशेप व चारोळ्या टाकून एक-दोन मिनिटं परतावं .  भेंडी टाकून परत परतावं . 

४)     मंद आचेवर ठेवावं .  झाकण ठेवून अधून-मधून हलवावं .  भेंडी शिजली की   ती कुरकुरीत होईल .