राजस्थानी भरवा लौकी

साहित्य :-rajasthai

१)      मध्यम आकाराचा दुधी भोपळा (साधारण तीनशे ग्रॅम)

२)     तेल अर्धी वाटी .

सारणासाठी :-

१)      किसलेलं पनीर पाऊण वाटी

२)     एक कांदा बारीक चिरून

३)     हिरव्या मिरच्या एक-दोन

४)     कोथिंबीर बारीक चिरून

५)    आमचूर , धणेपूड

६)      लाल तिखट प्रत्येकी अर्धा चमचा

७)    पाव इंच आलं किसून

८)     आवडत असल्यास काजू , बदाम , बेदाणे अर्धी वाटी

९)      चवीनुसार मीठ . 

सॉससाठी :-

१)      तीन मोठे टोमाटो

२)     अर्धा चमचा आलं किसून

३)     दीड चमचा लालभडक तिखट

४)     धणेपूड एक चमचा

५)    गरम मसाला अर्धा चमचा

६)      साखर अर्धा चमचा

७)    दोन मोठे डाव तेल

८)     दालचिनी दोन-तीन तुकडे

९)      लवंगा पाच-सहा

१०)  चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      दुधीची सालं काढून अख्खा दुधी एक कप पाणी , अर्धा चमचा मीठ टाकून कुकरमध्ये शिजवावा . 

२)     फक्त एक शिट्टी करावी .  गार झाल्यावर दुधीच्या आतला गरम चमच्यानं अलगद बाहेर काढून घ्यावा . 

३)     त्या गरामध्ये सारणासाठी दिलेले सगळे जिन्नस टाकून नीट कालवून ते    मिश्रण दुधीत भरावं .   

४)     कढाईत तीन-चार चमचे तेल टाकून दुधी सोनेरी-लालसर रंगावर परतून घ्यावा .  तेल टिपून काढण्यासाठी थोडावेळ कागदावर ठेवावा . 

५)    टोमाटो व आलं एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यावं .  कढाईत तेल गरम करून त्यात दालचिनी-लवंगा टाकून एक-दोन मिनिटं परतावं . 

६)      त्यात आधी तयार केलेली टोमाटो प्युरी टाकून सॉससाठी असलेले बाकी   जिन्नसही घालावे . 

७)    मंद आचेवर परतावं .  तेल सुटू लागल्यावर अर्धा-पाऊण कप पाणी टाकून उकळी आणावी .  (वाढताना दुधीचे एकसारख्या जाडीचे गोल तुकडे करून त्यावर सॉस ओतावा .  तूप लावलेल्या गरम फुलक्या-पोळीबरोबर भरवा लौकी खावा .)