राजे तुम्ही हवे होतात
|महाराष्ट्र बिघडलाय ,
बिघडलाय की बिघडवालय
हाच प्रश्न पडलाय ……………….|
राज घोड्यान केली सफर
जंगल पालथी पडलीत तुम्ही ,
मात्र आजच्या आमच्या राज्यकर्त्यांना
हेलीकॅप्तेर असून वेळ पुरत नाही ……………………..|
राजे वर्षामागे वर्ष चालाल
अजून स्वराज्य येत नाही,
तुमच्या जयंतीला मात्र राजे
दारू पिण सुटत नाही ……………………….|
राज घराची पायरी चढताना
तोल मात्र जातो आहे,
इंग्लिश –विंग्लिश देशी गावठी
रिचवत आम्ही चालोलो आहे ……………………|
बलात्कार झाले अत्याचार झाले
अशक्य ते शक्य झाले
याच गोंधळात मात्र राजे
मराठी तरुण मारले गेले ……………………….|
चुकी नव्हती राजे त्यांची
कसलीच नव्हती हाव,
बिहारीच्या गावापुढे
महाराष्ट्रीयाचे नाव …………………….|
शेतकऱ्याचे राष्ट्र म्हणून
भारत देश गणला,
भाववाढीसाठी राजा
आता पुन्हा एकदा कान्हला …………………………|
५ वर्षानंतर आता
सरकार राजा उठलाय,
कांदा शेतकरी मात्र राजे
aए सी गाडीत बसलाय ……………………………|
राज साद घालायचा प्रयत्न
आमचा असफल होतोय,
कराव काय सुचत नाही
तंबाखू मालवण्यात वेळ जातोय …………………….|
जागा मिळाली नाही राजे
तुम्हाला शहरात बसायला ,
४ दाराच्या स्मरका मध्ये
आता नमस्कार करायला ……………….|
अरबी समुद्रात म्हणे राजे
आपले स्मारक होणार ,
आपल्या विचारांच्या गर्दीला
नक्कीच दिशा मिळणार ……………………….|
आत्तापर्यंत शांत होतो राजे
आता मात्र बोलायचं,
खूप राग सरकार वर
आता मात्र लढायचं ……………………………..|
राजकारणात येतोय राजे
महाराष्ट्र घडवू पाहतोय ,
भास्त्रचार होवू देणार नाही
हीच हमी देतोय ……………………………….|
प्रयत्न होता राजे थोडा
महाराष्ट्र घडवायचा ,
तुमच्याच सांगण्यान
मावळा पुन्हा एकदा लढवायचं ……………..|
काय कराव सुचत नाही
मराव कि जगाव
महाराष्ट्राच्या इतिहासात
पुन्हां एकदा शिराव ……………………………|
मदत करा थोडी राजे
आमच्या या कार्याला ,
मराठ्याच्या विकासाला
अन आपल्या अस्तित्त्वाला ……………………..|
आमच्या या महाराष्ट्रला
राजे तुम्ही हवे होतात ,
स्वराज्यातून सुराज्याकडे नेणारे
राजे तुम्ही हवे होतात, राजे तुम्ही हवे होतात
राजे तुम्ही हवे होतात ………………………..||
– अंकित भामरे