राणेंवर प्रचाराची धुरा

rane
.नारायण राणे ह्यांच्यावर पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्याची जबाबदारी देण्यात आली आहे नारायण राणे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रचार समिती प्रमुख बनविण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाने जाहिर केलेल्या यादीनुसार राणे यांना प्रचार समितीचे प्रमुख बनविण्यात आले असून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे समन्वय समितीचे प्रमुखपद देण्यात आले आहे.
तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना जाहिरनामा समितीप्रमुखपद बहाल करून काँग्रेसने कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असा समतोल साधन्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, काही दिवसापूर्वीच नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाविरोधात बंड केले होते.
परंतू मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेत काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे जाहिर केले होते.