राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे अकाली निधन….

Rajeev-Patilदिग्दर्शक राजीव पाटील यांच्या अकाली मृत्यूची बातमी वाचली आणि धक्काच बसला! एक हरहुन्नरी दिग्दर्शकाला आपण फारच लवकर गमावले अशी भावना उत्पन्न झाली! खरोखर राजीव पाटील एक हरहुन्नरी दिग्दर्शक होते. ते मुळचे नाशिकचे. सुरुवातीला त्यांनी काही नाटचकांचे सह-दिग्दर्शन आणि दिग्दर्शन करून आपल्या करगिर्दीची सुरुवात केली. त्यावेळी ते ‘प्रयोग परिवार’ ह्या नाट्यसंस्थेसाठी काम करत. प्रेमाची गोष्ट’, ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या नाटकांना त्यांनी सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम केले होते. मग ते चित्रपटांकडे वळले. केवळ गल्लाभरू चित्रपट बनविण्यापेक्षा काहीतरी संदेश देणारा आणि उपेक्षितांना न्याय मिळवून देणारा सिनेमा तयार करण्यावर त्यांनी जोर दिला. त्यातूनच ‘पांगिरा’, ‘जोगवा’, ‘सावरखेड एक गाव’, ‘बहात्तर मैल एक प्रवास’, ‘सनई चौघडे’, ‘वंशवेल’ असे लोकप्रिय मराठी चित्रपट प्रेक्षकांपुढे आले. ‘जोगवा’ ह्या चित्रपटासाठी त्यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला होता. त्यांची हि यशोगाथा पुढे आणखी बहरली असती, मात्र हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी वयाच्या ४०व्या वर्षी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले! त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी एका तरुण दिग्दर्शकाला मुकली आहे!

दिग्दर्शक राजीव पाटील यांना m’m4मराठी’च्या परिवाराकडून विनम्र श्रद्धांजली!