राहा फॅशनेबल

fashion 1सणासुदीला कोणत्या प्रकारचे ड्रेस वापरावे असा प्रश्न असतो; पण त्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटतील असे पर्याय निवडणं योग्य आहे. ड्रेसमध्ये आपण खूप बारीक किंवा जाड दिसू का?, हा ड्रेस आपल्या पर्सनॅलिटीला मॅच होईल का अशा प्रश्नांमुळे विचलित न होता आत्मविश्‍वासपूर्वक कॅरी करावेत.
फॅशनेबल राहायचं म्हणजे पाश्‍चात्त्य धाटणीचे म्हणजेच वेस्टर्न आऊटफिटस किंवा ग्लॅमरस कपडे घालणं असं होत नाही. त्यासाठी आपण इतरही अनेक पर्याय वापरू शकतो. कोणत्याही कार्यक्रमासाठी आपल्याला कम्फर्टेबल वाटत असतील अशाच कपड्यांचा वापर करायला हवा. साधे पण लक्ष वेधून घालणारे कपडे वापरले तरी आपण फॅशनेबल दिसू शकतो हे नेहमी लक्षात घ्यायला हवं.
वेस्टर्न आऊटफिट्स वापरायचे असतील आणि आपण तरुण असाल तर त्या वेळी खाली निमुळती होत जाणारी जीन्स किंवा ट्राऊर्जसचा वापर करावा. भारतीय कपडे आपल्याला अधिक आरामदायी वाटत असतील तर त्यांचाच वापर करण्यावर अधिक प्राधान्य द्यावं. उंची कमी असेल तर उभ्या रेषा असलेले किंवा एम्ब्रॉयडरी असणारे कपडे वापरावेत. असे कपडे वापरल्यामुळे आपण उंच आहोत, असं वाटतं. सणासुदीच्या दिवशी कार्यक्रमाला जायचं असेल तर अनारकली हा सर्वात चांगला पर्याय आहे. पण, कुडत्याची उंची मात्र गुडघ्यापेक्षा जास्त असणार नाही याकडे लक्ष द्यायला हवं. साडी वापरण्याची इच्छा झाली तर स्लीव्हलेस ब्लाऊज घालण्याचा पर्याय आपल्यासमोर आहे. असे पर्याय अवलंबले तर समारंभाला कोणते कपडे वापरावेत, असा प्रश्न पडणारच नाही.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *