रोज काहीतरी वेगळ्या पद्धतीने करा

आपण अनेकदा अगदी रुटीन पद्धतीने जीवन जगत असतो थोडासा जरी विचार केला तर ती बाब लक्षात येईल , अनेकदा आपण उठल्यापासून झोपेपर्यंत अगदी ठरल्याप्रमाणे गोष्टी करत.
अगदी कार्यालयात जाण्याचा रस्ता आपण बदलत नाही की जेवणाची जागा त्यामुळे एक प्रकारचे साचलेपण आयुष्यात येते दिवस कंटाळवाणे वाटू लागतात
तुमच्या शरीरात शरीराला मनाला कंटाळा येतो त्याचप्रमाणे मेंदूलाही कंटाळा येतो पण आपल्या ते लक्षात येत नाही
त्यामुळे तो दूर करण्यासाठी साध्या सोप्या गोष्टी केल्यात तरी बऱ्याच प्रमाणात मेंदूचा कंटाळा दूर होतो त्यासाठी रोजच्या नेहमीच्या जीवनात काही ना काही वेगळे करण्याचा आवर्जून प्रयत्न करा .
कधीतरी संध्याकाळी निवांत कविता वाचन , कधीतरी गझल ऐका .

काहीतरी घरात येताना बाहेरून फुलांच्या सुंदर गुच्छ घरात घेऊन या त्यामुळे त्यावर त्यामुळे वातावरण किती प्रसन्न होते व मेंदूला कसा तजेलदारपणा येतो ते पहा .
त्याच प्रमाणे कामाला जाताना कधीतरी नवख्या व वेगळ्या रस्त्याने जा त्यासाठी अधिक वेळ लागला तरी चालेल त्यासाठी घरातून थोडे लवकर बाहेर पडा .
त्यामुळे मेंदूला नवीन खाद्य मिळते आजूबाजूच्या अपरिचित व नव्या वास्तू पाहताना त्याला वेगळाच व्यायाम मिळतो मात्र या सोप्या गोष्टी आपल्या ध्यानात येत नाही
किंवा ध्यानात आल्या तरी त्याचा फायदा आपल्या मेंदूलाही होत असतो हे आपल्याला ठाऊक नसते .

कधीतरी सुट्टीच्या दिवशी नवख्या स्थळाला भेट द्या नव्या उद्यानांचा प्रसन्न वाटेल अशा निसर्गाच्या ठिकाणी भेट द्या .
रोजच्या पेक्षा काही तरी वेगळे करण्याचा सुट्टीच्या दिवशी तरी नक्की प्रयत्न करा .
त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढीसाठी मोलाची मदत होते हे लक्षात घ्या