रोटी..रोजा.. राजकारण..!

ms
भारतीय राजकारण म्हणजे एखाद्या गलिच्छ गटारगंगेसारखं झालं आहे.मुद्दा कुठलाही असो त्याचं राजकारण करायचं आणि सत्ता धारयांना किव्हा विरोधी पक्षाला धारेवर धरायचं हि इथली जुनी परंपरा,आणि त्यात मुद्दा जर धार्मिक असेल तर मग वादाला वाच्यता आणि प्रसिद्धीची १००% हमी. त्यात इथली प्रसार माध्यमे आहेतच राईचा रेडा करण्यासाठी..!
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात होत असलेल्या मनमर्जी कारभारावर आणि तुटपुंज्या व्यवस्थेवर जाब विचारणाऱ्या खासदारांना अनेक टिक्काना सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्र सदनात इतर राज्यांच्या तुलनेत अतिशय निकृष्ठ दर्जाचं जेवण आणि व्यवस्था दिली जाते,ह्याबद्दल अनेक वेळा पाठपुरावा केला गेला होता.मात्र तिथले आयुक्त असलेले मलिक आपल्या मन्मार्जीने कारभार चालवीत राहिले आणि कुठल्याचं पाठपुराव्याची दाखल घेतली नाही.त्यामुळे हा मुद्दा पुन्हा मांडला गेला,आणि सदनातल्या अचारयाला जाब विचारायला गेलेले शिवसेनेचे खासदार विचारे ह्यांना अचारयाच्या तोंडात बळजबरीने रोटी कोंबण्याचा वाद संसदेत विरोधी पक्षाने लाऊन धरला,का?तर म्हणे आचारी हा मुस्लीम आहे आणि त्याचा रोजा सुरु होता.आणि त्याचा रोजा सोडण्याचं पाप विचारेंनी केल.मुळात अचारी कुठल्या धर्माचा हे खासदाराला कसं कळणार? आणि मुद्दा रोजच्या रोटीचा होता रोजाचा नाही..!तरी देखील ह्या वादाला धार्मिक रूप देण्यात आलं.
शिजवलेलं अन्न आधी आचाऱ्याने चाखायचं असतं हा नियम आहे,मग जर रोजाचा उपवास होता तर हा मुस्लीम आचारी का ठेवण्यात आला?हा प्रश्न निर्माण होतो.शिवाय रोजा असल्यामुळे तो अन्न चाखत नसेल तर मग जेवणाचा दर्जा कोण तपासणार?
साधी साधी प्रश्न आहेत समजण्यासारखी पण नाही….फक्त वादावादी करायची आणि देशात अराजकता माजावयाची एवढचं येते इथल्या राजकारण्यांना.पण जनतेच्या भावनांना कोण आवर घालणार ह्याचा तरी विचार त्यांनी करायला हवा.