लई भारी नंतर आता poshter Boys ची बारी

poshter
लई भारी नंतर आता poshter Boys ची बारी
मराठी चित्रपट सृष्टीत येणारी आधुनिकता आणि होणारा बदल खूप वेगळा आणि सुखावणारा आहे.दर्जेदार कथा असलेले मराठी चित्रपट आणि त्या मध्ये असलेला ग्रामीण भागाचा देखावा,उत्तम कथानक आणिक दर्जेदार अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे.
गेल्या काही वर्षात अमुलाग्र बदल मराठीत आलेला असून दुनियादारी,टाईमपास,आत्ता आलेला रितेश देशमुखचा पहिला मराठी सिनेमा “लई भारी”ह्या चित्रपटांनी तर इतिहासच रचला आहे.तसेच मराठी Box Office वर चांगलाच गल्ला गोळा केला आहे.
आता नवीन आलेला श्रेयश तळपदे निर्मित Poshter Boys हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे.
कारण ह्या सिनेमात आगळा वेगळा विषय हाताळण्यात आलेला आहे.
पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया हा नवा विषय अतिशय गमतीशीरपणे मांडण्याचा प्रयत्न ह्यात केलेला आहे.
दिलीप प्रभावळकर ह्यांची भूमिका अतिशय मजेदार आहे.ह्यात सिनेमात श्रेयश तळपदेची देखील छोटीशी भूमिका पाहायला मिळते.
अतिशय रंजक आणि सामाजिक संदेश देणारा हा सिनेमा आहे त्यामुळे आपण हा सिनेमा नक्की बघावा.