‘लई भारी’

lai bhari

गेल्या २० वर्षांहून जास्त काळ बॉलिवूड गाजवल्यावर आणि बॉक्स ऑफिसवर वेगवेगळे रेकॉर्ड्स केल्यावर सलमान खान आता मराठी सिनेमा करण्यासाठी सज्ज झाला आहे. या बातमीमुळे सलमान खानचे मराठी फॅन्स आनंदी झाले आहेत. सध्या सलमान खान हैदराबादमध्ये शूट करत आहे. 

सलमान खान काम करणार असलेल्या मराठी सिनेमाचं नाव ‘लई भारी’ असं असेल. या सिनेमात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असेल. सलमान खान या सिनेमात एक लहानशी भूमिका करणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन मराठी आणि हिंदी सिनेमांमधील नावाजलेला दिग्दर्शक निशिकांत कामत करणार आहे. निशिकांतचे आत्तापर्यंत ‘डोंबिवली फास्ट’ हा मराठी, तर ‘मुंबई मेरी जान’ आणि जॉन आब्रहमबरोबर केलेला ‘फोर्स’ हे सिनेमे गाजले आहेत. 

आपल्या संपूर्ण कारकीर्दीत सलमान प्रथमच प्रादेशिक भाषेत सिनेमा करणार आहे आणि तो सिनेमा मराठी असणार आहे. सलमान खानची आई मराठी असल्यामुळे त्याला मराठी भाषेबद्दल आत्मियता आहे. यापूर्वीही महेश मांजकरेकर यांच्या ‘शिक्षणाच्या आयचा घो’ या मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास सलमान खान राजी झाला होता. मात्र सलमानच्या व्यस्त शेड्युलमुळे हा सिनेमा अद्याप सुरू झाला नाही. 

‘लई भारी’ हा सिनेमा येत्या 11 जुलै ला प्रदर्शित होतो आहे .  लई भारी हा सिनेमा अत्तापार्यान्ताचा सर्वात महागडा मराठी सिनेमा असणार आहे 

One Comment