लठ्ठपणावरील उपाय….

images     लठ्ठपणा हि अनेकांना भेडसावणारी समस्या आहे. आपल्या आहाराचे प्रमाण आणि शारीरिक कष्ट यात तफावत झाली कि वजन वाढते आणि लठ्ठपणाची समस्याही भेडसावते. लठ्ठपणामुळे अनेक शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोकाही नाकारता येऊ शकत नाही. लाठ्ठ्पणावर मात करण्यासाठी काही उपाय खाली देत आहोत….

१)      जेवणाचे वेळापत्रक आखून याचे काटेकोर पालन करावे. रात्री उशिरा जेवण टाळावे. जेवण आणि झोप यात दोन तासांचे अंतर राखावे.

२)      पाणी भरपूर प्यावे. दिवसभरात किमान १४-१६ ग्लास पाणी प्यावे.

३)      तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, साबुदाणा, भात, बटाटे, बाहेरचेचे जेवण टाळावे.

४)       कडधान्य, सॅलड, हिरव्या भाज्या, ताजी फळे, ताक, ग्रीन टी. यांचा आहारात समावेश करावा.

५)      व्यायाम आणि योगासने करावीत. रोज किमान ३०-४० मिनिटे तरी पायी चालावे.

6 Comments