लागला टकळा, पंढरीचा ।।

vari
आयुष्याची विकसंशीलता कुठेतरी अध्यात्माच्या वाटेवर नेऊन प्रगल्भित जगण्याचा आधार शोधणार्या वैष्णवांच्या वारीमध्ये,सुखं -दुख्खाची पराकाष्ठा सोसत, आयुष्याचा काही भाग परमार्था कामी लागावा,आत्मिक विवंचनेत गुरफटून न राहता रात्रीच्या गर्भातला उद्याचा उष:काल  शोधण्या वारकर्यांच प्रत्येक पाऊल  त्या वारीत पडत असत,कारण फटकळ दुनियेच्या कुजक्या जीवन शैलीला लाथाडून पूरोगामी आघाडीतून शिरोगामी परमात्मा शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे वारी…  वारी……  आणि फक्त वारीचं असतो.
आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासाठी एक चैतन्याचा आनंदोत्सव असतो.
आपल्या लाडक्या विठु रायाला भेटण्यासाठी हजारो मैलाची पायपीट करून  वारकारी पंढरपुरात दाखल होत असतो.
“पुंडलिका वरदे हरी विठ्ठल,श्री ज्ञानदेव तुकाराम” अशा निर्घोषाने चंद्रभागेचा तठ दुमदुमून उठत.
सगळी कष्टे,दुखे विसरून वाट चालावी चालावी  असं म्हणत,बाया बापड्या मस्तकावर तुळशीच वृंदावन घेऊन विठ्ठल गजरात लीन होत असतात …. कारण …।
संपदा सोहळा । नावडे मनाला ।।
लागला टकळा ।। पंढरीचा ।।1।।
जावे पंढरीसी । आवडी मनासी ।।
कई एकादशी । आषाढी ये ।।2।।
तुका म्हणे ऐसे। आर्त ज्याचे मनी।।
त्याची चक्रपाणी । वाट पाहे ।।3।।