लाभकारी बटाटा

potatoसामान्यत: बटाटा खाल्ल्याने व्यक्ती लठ्ठ होते. त्यामुळे मधुमेह होण्याच्या धोक्यात वाढ होते, असे अनेक गैरसमज बटाट्याच्या बाबतीत समजले जातात. मात्र हा बटाटा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती गुणकारी आहे हे कुणाला माहिती नसते. तर बघूया बटाट्याचे फायदे..

1.बटाट्यामध्ये अनेक पौष्टिक तत्त्वं आहेत जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

2.बटाट्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर पोटॅशियम आढळते जे आपल्या कमी रक्त दाबाला सामान्य करण्यासाठी गरजेचे असते.

3.बटाटा सालीसह खाल्ल्यास तुम्हाला फायबर मिळते व या फायबरमुळे हार्टअँटॅकचा धोका कमी होतो.

4.एखाद्या कमी वजनाच्या व्यक्तीस बटाटा खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण त्यामुळे त्या व्यक्तीचे वजन वाढण्यास मदत होते.

5.एखादी व्यक्ती भाजली असेल किंवा त्याला जखम झाली असेल तर त्या जखमेवर बटाट्याची साल लावतात. त्यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते.