लाल लाल एस टी थांब जरा…!
|लाल लाल एस टी थांब जरा, अशी कविता लहानपणी आपण आपण सगळ्यांनीच म्हटली असेल,गाव तिथे लाल डब्बा,म्हणजे बस ची स्वारी पूर्वी होत असे,आजही काही प्रमाणात खेड्यावर बसची ने-आन आपल्याला बघायला मिळते.
जुन्या आठवणीची साक्ष देणारी,मामाच्या गावाला घेऊन जाणारी एसटी,आता वाढत्या महागाईत तग धरेनाशी झाली आहे.
राज्य परिवहन प्राधिकरणाच्या झालेल्या बैठकीत राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तिकीट दरांत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी प्रशासनाच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला प्राधिकरणाने मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 1 जूनपासून एसटीच्या भाड्यात अडीच टक्के वाढ होईल.
पहिल्या दोन टप्प्यांतील भाडे वाढवण्यात आलेले नाही. त्यामुळे कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसणार नाही, असे सांगण्यात आले. इंधन दरवाढीमुळे एसटीला मोठा फटका बसत आहे. एसटीचा संचित तोटा एक हजार कोटींपेक्षा जास्त झाला आहे. राज्य सरकारकडून 1 हजार 500 कोटी रुपये मिळणे बाकी आहे. त्यामुळे एसटीला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी भाडेवाढ करण्यात आली आहे.मंगळवारी राज्य परिवहन प्राधिकरणाच्या व एसटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला एसटीचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष व्ही. एन. मोरे, राज्य परिवहन सचिव शैलेशकुमार शर्मा व एसटीचे अधिकारी उपस्थित होते. याबाबतची घोषणा एक-दोन दिवसांत होण्याची