लिपस्टीक काय सांगते?

lipstickमेकअपमध्ये लिपस्टिकचा वापर अनिवार्य ठरतो. महिला कोणत्या रंगाची लिपस्टिक लावतात यावरूनही त्यांच्या स्वभावाचं परीक्षण करता येतं. गुलाबी रंगाची लिपस्टिक पसंत करणार्‍या स्त्रिया रोमँटिक असतात. गुलाबी रंगावर शुक्राचा प्रभाव असतो. या स्त्रिया कोमल हृदयी आणि दुसर्‍याचं दु:ख जाणून घेणार्‍या असतात. संसाराप्रती सर्मपित असणार्‍या या स्त्रियांचा सहवास आनंददायी आणि आश्‍वासक असतो. त्या कलाविश्‍वात रमतात. तांबड्या रंगाची भडक लिपस्टिक वापरणार्‍या स्त्रियांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्या उत्साह आणि आवेगानं ओतप्रत भरलेल्या असतात. कुठल्याही परिस्थितीचा खंबीरतेने सामना करणं हे यांचं वैशिष्ट्य. चलाख आणि प्रावीण्य ही यांची बलस्थान आहेत. त्या उत्तम संघटक असतात. लिपस्टिकपेक्षा लिपग्लॉस वापरणार्‍या स्त्रियांवर चंद्राचा प्रभाव असतो. त्यांना कुठलेही भडक रंग आकर्षित करत नाहीत. या महिला शांती आणि सद्भावनाप्रिय असतात. कुठलंही गुपित आपल्यापुरतंच ठेवण्याची त्यांची हातोटी असते. या महिला जबाबदारी पेलताना मात्र कमी पडतात. त्यामुळे त्यांची व्यावसायिक प्रगती धीम्या गतीने होते. ओठांवर नारंगी लिपस्टिक लावणार्‍या स्त्रियांवर सूर्याचा प्रभाव असतो. या महिलांना सामाजिक कार्यात रुची असते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *