लेगिंग्झ फॅशन

leggings fashionप्रत्येक जण आपापल्या स्टॉइलनुसार लूक बदलत असतात. त्यानुसार वेगवेगळय़ा कपड्यांची फॅशन निघत असते. एखादी फॅशन बाजारात आली कि त्याच फॅशनची क्रेझ सर्वत्र दिसत असते. पॅण्टमध्ये जीन्स किंवा फॉर्मल असे दोनच प्रकार होते. आता बाजारात प्रिंटेड पॅण्ट व त्यावर इनर व इनर वरून ज्ॉकेट घालण्याची फॅशन आहे. जिकडेतिकडे तुम्हाला असेच कपडे परिधान केलेले दिसतात. ही पॅण्ट थोडी स्किनला फिट असते. त्यामध्ये निळय़ा, हिरव्या, पांढर्‍या पॅण्टवर गुलाबी, पिवळी अशा विविध कलर्समध्ये फुले उपलब्ध आहेत. ज्या मुलींना जीन्स घालणे आवडत नाही त्या मुलींसाठी हा वेगळा पर्याय आहे. या पॅण्ट सहलीसाठी किंवा मौजमस्तीच्या ठिकाणी घालण्यासारख्या आहेत, मात्र तरुणी त्याचा वापर कॉलेज, नोकरी, बाजारात फिरताना, घरात करताना दिसत आहे.  या पॅण्टवर जर तुम्हाला इनर व ज्ॉकेट घालायचे नसेल तर शॉर्ट फॉर्मल शर्टही घालू शकता. तसेच अशा पॅण्टमध्ये अजून एक पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे लेगिंग्झ. लेगिंग्झ इलेस्टीक किंवा जीन्ससारखी असते. ती घालायला एकदम हलकी असते. लेगिंग्झच्या खिशाला व खाली पायाला चेन असते. हा थोडा फं क्की लूक आहे. पण तरुणाईला फॅ शनच्या नावाखाली काहीही घालायला आवडते, हे या पॅण्टवरून दिसते. या लोवेस्टही असतात. ही पॅण्ट तुम्हाला लांबून पाहिली तर नाईट सूटसारखी वाटते. मात्र जवळून तिचा लूक जीन्ससारखाच आहे. आता बाजारात या लेगिंग्झची चलती आहे.