वजन कमी करण्याचे उपाय.

weight-lossवजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते तुमच्या आहारांवर नियंत्रण ठेवणे. काही नैसर्गिक पदार्थ असे आहे जे खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. तुम्हाला कष्ट कमी करून वजन कमी करायचे असेल तर हे उपाय करून पाहा.?

१.साखर, बटाटा आणि तांदूळ यांसारख्या अन्नपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात काबरेहायड्रेट असते. त्यामुळे चरबी वाढते. हे खाणे कमी करावे.

२.फक्त गव्हाच्या पिठाची पोळी खाण्यापेक्षा गहू, सोयाबीन आणि हरभरेमि२िँं१्रूँं१त पिठाची पोळी फायदेशीर ठरते.

३.दररोज पत्ताकोबीचा ज्युस प्यावा.

४.पताकोबीमध्ये चरबी कमी करणारे गुण असतात. यामुळे शरीरातील मेटाबॉलिझम योग्य राहतो.

५.पपई नियमित खा. पपई खाल्ल्याने अतिरिक्त चरबी कमी होते.

६.दही खावे त्यामुळेही चरबी कमी होते.

७.प्रत्येक दिवशी घरात तयार केलेले एक ग्लास ताक प्यावे.

८.कारल्याची अर्धवट कच्ची भाजी खाल्ल्यास वजन कमी करायला मदत करते.

९.आवळा आणि हळद समप्रमाणात घेऊन बारीक चूर्ण तयार करा. हे चूर्ण ताकामध्ये टाकून घेतल्यास कंबर बारीक होते.

१०.एक चमचा पुदिन्याच्या रसात २ चमचे मध मिसळून घेतल्यास हे मिश्रण फायदेशीर ठरते त्यामुळे वजन कमी होते.

११.लाल तिखटामधील कॅप्सासिन नावाचा घटक हा वेदनाशामक म्हणूनही फायदेशीर ठरतो. दमा, सर्दी, ताप या आजारात हा पदार्थ पूरक ठरतो व त्यामुळे वजनही कमी होते.

१२.गाजराचे भरपूर सेवन करावे.

१३.मध एक कॉम्पलेक्स साखर आहे. जी लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

१४.हिरडा किंवा बेहडा यांचे चूर्ण एक एक चमचा ५0 ग्रॅम पडवळाच्या रसासोबत (एक ग्लास) मिसळून घेतल्याने वजन खूप लवकर कमी होते आणि थकवाही निघून जातो.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *