वजन घटवायचेय..?

Weight Lossवजन कमी करण्यासाठी अनेक अघोरी उपाय केले जातात. आहार अगदी कमी करणं, अतिरेकी व्यायाम, वजन कमी करणार्‍या गोळ्यांचं सेवन आदी मार्गानं वाढलेलं वजन कमी करण्याचा प्रय▪केला जातो; पण बरेचदा याचा विपरित परिणाम बघायला मिळतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. दर महिन्याला ठरावीक वजन कमी करण्याचा प्रय▪केला जावा. साधारणपणे महिन्याला दीड ते दोन किलो वजन कमी करणे सुरक्षित समजले जाते. खाण्यापिण्यात बदल करूनही वजन कमी होऊ शकते. आहारातील चरबीयुक्त पदार्थ, मीठ आणि साखरेचे प्रमाण कमी केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. आहारातील डेअरी उत्पादनांचे प्रमाण कमी केल्यास चांगला परिणाम पाहायला मिळतो. डाळ, मासे, चिकनच्या माध्यमातून पर्याप्त प्रमाणात प्रोटीनची मात्रा मिळते. गव्हाचा ब्रेड, ओट्स, ताज्या भाज्या, ताजी फळे नियमितपणे आणि ठरावीक प्रमाणात घेतल्यास वजन नियंत्रणात राहते. आहारात सनफ्लॉवर, ऑलिव्ह ऑईल, कॅनोला अशा दोन तीन प्रकारच्या तेलांचा समावेश असावा. एका व्यक्तीसाठी महिन्याला अर्धा लिटर तेल हे प्रमाण वजन नियंत्रणात ठेवणारे आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *