वर्कला

वर्काला बीच – केरळ पर्यटन स्थळ

केरळमध्ये जाणार म्हटल्यावर तुम्हाला समुद्र किनारे फिरायलाच हवेत. वर्काला हा केरळमधील असा परीसर आहे जिथे तुम्ही हमखास जायला हवे कारण हा समुद्र किनारा फारच सुंदर आहे. कोवलम आणि वर्काला अशी निवड करायची झाली तर तुम्ही वर्कालाला नक्की पसंती द्या कारण या समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला खूप चांगले फोटो काढता येतील. आता या ठिकाणीही तुम्हाला मंदिर आहेत. येथील जनार्दनस्वामींचे मंदिर फारच प्रसिद्ध आहे.

पाहण्यासारखी ठिकाणं

जनार्दन स्वामी मंदिर,वर्कला बीच, कपील बीच आणि जनार्दन स्वामी मंदिर

वर्कलामध्ये करण्यासारख्या गोष्टी

तुम्हाला या ठिकाणी बीचवर छान वेळ घालवता येईल. मस्त समुद्र किनारी बसून नारळपाण्याचा आस्वाद घेता येईल.