वर्ल्ड कप शुटींगमध्ये हीना सिद्धूने रचला ‘सुवर्णअध्याय’…..

HS-4तमाम क्रीडारसिकांना सचिन तेंडूलकरच्या अखेरच्या विक्रमी २००व्या कसोटी सामन्याचे वेध लागले असतांना तिकडे ‘नेमबाजी’त ‘सुवर्ण-अध्याय’ रचला गेला आहे! भारताची महिला पिस्तुल नेमबाज हीना सिद्धू हिने जर्मनीच्या म्युनिच मध्ये आयोजित आयएसएस वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ‘सुवर्णपदक’ मिळविले. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय ‘पिस्तुल’नेमबाज ठरली आहे हेही विशेष!

याआधी अंजली भागवत (2002) आणि गगन नारंगने रायफल शूटिगंमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. आयएसएसफ वर्ल्ड कप फाइनल्स वर्षातून एकदाच आयोजित केली जाते. यामध्ये जगातील दहा नेमबाज सहभागी होतात.

हीना पात्रता फेरीत 384 पॉईंट्स मिळवून युक्रेनच्या ओलेनानंतर तिसऱ्या स्थानावर राहिती. पण चीनच्या गुओ (नवव्या) आणि सर्बियाच्या जोराना (सहाव्या) यांच्यापेक्षा पुढे होती.

तिने 9.3 आणि त्यानंतर 9.3 पॉईंट असा स्कोअर केला. पहिल्या दोन शॉट्सनंतर तिची आठव्या स्थानावर फेकली गेली. मात्र त्यानंतर तिने शानदार कमबॅक करत 15 अचून निशाणे साधले आणि 5.2 पॉईंट्सची कमाई केली. त्यानंतर तिने कोणतीही दिरंगाई न करता सुवर्णवेध साधला.