वाटणी

house paintingसकाळ-सकाळी दोन्ही सुना आज लागल्या कल-कलू ,

गप्प बसलेले नवरे आता मधेच लागले बोलू .

 

बोलता-बोलता हमरी-तुमरी बाचा-बाची वाढली ,

धाकय्यान मग एक नवीच युक्ती शोधून काढली .

 

म्हटला एकमात्र दादा आता आपल काही पटणार

नाही आणि वाटणी केल्या शिवाय आपल्या घराचा

प्रश्न काही मिटणार नाही .

 

थोरल्यानही होकार दिला पंचायात बोलवायला

निघून गेला पन्नास वर्षांचा संसार त्यांचा

अंगणात यांनी जमा केला .

 

झाला कारे सगळ वाटून सरपंचाने प्रश्न केला ,

वाघाद्ल्या सारख करत थोरला हळूच बोलून गेला ,

म्हटला , बाबांचा दवाखाना मला काही पेलणार नाही ,

म्हणून त्याच्याकडे द्या बाबा माझ्याकडे घेतो आई .

 

ऐकून त्याच बोलन , त्या दोघांच्या कालीजच फाटलं,

पोटाच्या पोरांनच , स्वतः आज जन्मदात्याना वाटल

 

पन्नास वर्षाच्या दृश्य डोळ्या समोर तरू लागल

कळवळणार मन त्याच विधात्याला म्हणू लागले ,

देवा , असल्या दिवस दावण्या अगोदर आम्हालाच का उचलून नेल नाही ?

अरे पोटी पोर देण्या पेक्षा वाझोटच का केला नाही ?

 

-धनगर विपुल शांताराम