वादग्रस्त PK चं poshter

pk
मिस्टर पर्फेक्शनीस्ट म्हणुन ओळखला जाणारा अभिनेता अमीर खान ह्याचे सिनेमे नेहमी उत्कंठा वाढविणारे आणि सस्पेन्स असतात.त्यामुळे त्याच्या येणारा प्रत्येक सिनेमाची दर्शक अतिशय आतुरतेने वाट बघत असतात कारण आमिरचे सिनेमे हे वर्षातून एक दोन वेळाच झळकतात त्यामुळे काहीतरी नाविन्य आणि सोशल संदेश त्यात असतोच.
आमिरचा सत्यमेव जयते हा REALITY show चे दोघेही पर्व खूप गाजले…कारण त्यात भारताच्या एकुण सामाजिक परिस्थितीवर भाष्य होते.त्याच्या नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या धूम-३ ह्या सिनेमाने तर इतिहासच रचला.आता आमिरचा नवा सिनेमा pk डिसेंबर मध्ये प्रदर्शित होतोय त्याचं एक motion picture नुकतंच release झालं.मात्र ते आता वादाच्या भोवरयात सापडल आहे.कारण ह्या चित्रात अमीर पूर्ण नागडा होऊन हातात टेप रेकोर्डर घेऊन उभा आहे.मुळात कुणी अभेनेत्याने असं नागड होण हि काही नवीन बाब नाही मात्र अमीर सारख्या सालस,आणि वैचारिक पातळी असणाऱ्या अभिनेत्याला हे शोभत नाही असं अमीर प्रेमींच म्हणन आहे,आणि ते योग्य देखील आहे.कारण सत्यमेव जयते,रंग दे बसंती ,लगान,मंगल पांडे ह्या भूमिकांनी आमिरची वेगळी छाप सीने-जगतावर पडली आहे त्यामुळे लोकांच्या अपेक्षा अमीर कडून खूप वेगळ्या आहेत.ह्याचा विचार अमीरने देखील करायला हवा.