वालीची भाजी
|(पावसाळ्यात तसंच उन्हाळ्यात वालीच्या लांब शेंगा मिळतात . त्यांची भाजी चवदार होते .)
साहित्य :-
१) वालीच्या शेंगा एक जुडी
२) बटाटे मध्यम दोन
३) काळा मसाला एक चमचा
४) तिखट एक चमचा
५) गुळ , मीठ
६) ओलं खोबरं .
कृती :-
१) वालीच्या शेंगा गवारीच्या शेंगांप्रमाणे मोडून घ्याव्यात . त्यांचे कडेचे दोर निघतात .
२) मोडलेल्या शेंगा पाण्यात टाकाव्यात . बटाटे सोलून त्यांच्या मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात .
३) तेलाच्या फोडणीत शेंगांचे तुकडे व बटाटे टाकून चांगलं परतावं .
४) एक-दोन वाटी गरम पाणी टाकून शिजवावं .
५) शिजत येता-येताच मीठ , गुळ , लाल तिखट , गोडा मसाला व ओलं खोबरं टाकून भाजी चांगली परतावी . वाफा काढून झाकण ठेवावं .