विश्वनाथन आनंदला नमवून मॅग्नस कार्लसन ठरला बुद्धिबळातील विश्वविजेता
|जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत गात विश्वविजेता विश्वनाथन आनंद याचा नामुष्कीजनक पराभव करीत नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन (वय २२) याने विश्वविजेतेपद मिळविले. काल शुक्रवारी चेन्नई येथे झालेल्या लढतीत कार्लसनने आनंदवर ६.५-३.५ अशी मात केली.
बुद्धिबळाचा जगज्जेता होणारा कार्लसन हा दुसर्या क्रमांकाचा सर्वांत कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. याआधी १९८५ मध्ये गॅरी कास्पारोव्हनेही वयाच्या २२ व्या वर्षीच ही कामगिरी केली होती. आनंदविरुद्धच्या लढतीमधील १२ वा डाव बरोबरीत सोडवून कार्लसनने विजयावर शिक्कामोर्तब केले.