वेनपोंगल ( मद्रासी खारा भात )

timthumb.php

 

 

साहित्य :-  

१)      दोन वाट्या तांदूळ

२)     एक वाटी मुग डाळ

३)     अर्धी वाटी काजू पाकळ्या

४)     एक चमचा मोहरी

५)    चार-पाच सुक्या मिरच्या

६)      एक मोठा चमचा किसलेलं आलं

७)    अर्धा चमचा जाड कुटलेली मिरी

८)     पाव वाटी तूप

९)      अर्धी वाटी ओलं खोबरं , मीठ .  

कृती :-  

१)      डाळ आणि तांदूळ वेगवेगळे धुऊन निथळावे .  पाच-सहा वाट्या पाणी उकळावं .  

२)     जाड बुडाच्या पातेलीत तूप गरम करून त्यात काजू पाकळ्या तळून घ्याव्या आणि बाजूला ठेवाव्या .  

३)     मिरच्यांचे तुकडे करावे .  नंतर त्याच तुपात मोहरी , मिरी आणि सुक्या मिरच्या फोडणीला घालून प्रथम डाळ परतावी .  

४)     नंतर तांदूळ परतून आलं आणि मीठ घालून गरजेनुसार उकळत पाणी घालून भात शिजवावा .  

५)   बोटचेपा भात शिजल्यावर त्यात खोबरं मिसळाव आणि चांगली वाफ येऊ द्यावी .