व्यर्थ न जावो बलिदान…!

index
डॉ.नरेंद्र दाभोळकर,अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आपलं उभ आयुष्य वेचून शहीद झालेलं एक असामान्य व्यक्तिमत्व.भारतीय समाज हा अंधश्रद्धेतून बाहेर आला पाहिजे,विज्ञानाधिष्ठ झाला पाहिजे,अघोरी जीवघेण्या आणि लुबाडणूक करणाऱ्या प्रथा आणि परंपरा बंद झाल्या पाहिजे ह्यासाठी पेटलेलं एक अग्निकुंड.
अंधश्रद्धेचा समाज मनावर होणारा खोलवर परीणाम हा अखं:कुटुंब आणि पर्यायाने संपूर्ण समाजाला उधवस्त करू शकतो त्यामुळे अश्या कर्मकांडाला अंकुश लागायला हवा,आणि मानवीय मर्यादेला जाचक अटी बसायला हव्या जेणेकरून भारताची ओळख हि पुरोगामी म्हणून टिकून राहिलं हा डॉ.दाभोळकारांचा अट्टहास होता.आणि म्हणूनच समाज परिवर्तनासाठी अशा बिनबुडाचे अघोरी कर्मकांड बंद झाले पाहिजे,दैव वादाच्या साखळदंडात अडकलेली माणुसकी जागृत झाली पाहिजे आणि खोटी चमत्कारे बंद व्हयला हवी ह्यासाठी अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस)ची स्थापना झाली आणि जोडली गेली अनेक कर्तुत्ववान हात ह्या चळवळीत.आणि उभ राहिलं एक जनांदोलन…….!
मात्र ह्या चळवळीला काही धर्मांध वर्ण-वर्चस्ववादी सनातन टोळीनी हाणून पाडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि हे आंदोलन थांबत नाही म्हणून डॉ दाभोळकर ह्यांची हत्या करण्यात आली.मात्र ह्या असुरी शक्तींना हे ठाऊक नाही कि व्यक्ती मारून विचार थांबवता येत नाहीत.डॉ. दाभोळकर यांच्या खूनाला आज वर्ष झालं तरी मारेकरी सापडले नाही वा एखादी संशयास्पद अटकही झाली नाही ,याला प्रशासनाची हलगर्जी म्हणावी कि दाभोळकरांचा उपहास? तपासासाठी चक्क प्लान्चेट चा वापर करण्यात आला.ज्या माणसाने अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्य खर्ची घातलं त्या माणसाच्या खूनाचा तपास अंधश्रद्धेतून व्हावा.तसे या देशाला दिवंगत महापुषांचे होणारे अपमान हि काही नवीन गोष्ट नाही,आजही नथुराम गोडसेचे गोडवे गाणारे देशद्रोही या देशात आहेत .बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या राज्यघट नेला न मानणारे देखील आहेत,शिवरायांची बदनामी करणारे उपटसुंभ देखील आहेत,त्यामुळे नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमागच्या शोधाचा हलगर्जीपणा एक स्वाभाविक गोष्ट आहे.कारण जात भाईच्या पाठींब्यावर धुडघूस घालणारे महाभाग गल्लो गल्ली आहेत .
जि लोक आंदोलन करतात,तोडफोड करतात.मंत्र्यांच्या अंगावर शाई फेकतात अश्या लोकांच्या मागण्या लगेच मान्य केल्या जातात.मात्र विवेकवादी ,अहिंसेच्या मार्गाने न्याय मागणार्यांची नेहमी उपेक्षाच होते.असो तरी हि चळवळ चालूच राहणार आहे अखंडपणे……….न्यायासाठी,हक्कासाठी शांतीच्या मार्गाने.कारण डॉ.नरेंद्र दाभोलकरांच बलिदान हे व्यर्थ जाणार नाही.