व्यसनमुक्तीसाठी राजस्थान सरकारचा स्तुत्य निर्णय……

indexराजस्थान सरकारच्या एका निर्णयाचे कौतुक करावेसे वाटते. हा निर्णय तिथल्या सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या नवीन भरतीसंबंधी घेतला आहे. या निर्णयानुसार धुम्रपान किंवा गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तींना शासकीय नोकरी मिळणार नाही. हा निर्णय जरा जास्तच कडक वाटत असला तरीही कौतुकास्पदच आहे. ह्या निर्णयाची काटेकोर अंमलबजवानी झाल्यास त्या राज्यात व्यसनमुक्तीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होईल. कारण, शिक्षण संपल्यानंतर बहुसंख्य तरुण शासकीय नोकरी मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. हातातोंडाशी आलेली नोकरी जर केवळ व्यसनामुळे दूर जात असेल तर कुणालाही व्यसन नकोसेच वाटेल. त्यामुळे नव्या पिढीमध्ये व्यसनी लोकांची संख्या कमी राहील.

तरुण आणि पर्यायाने येणाऱ्या नवीन पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी राजस्थान सरकारचा हा निर्णय नक्कीच चांगला आहे. इतर राज्यांनीही ह्या अशा प्रकारचा निर्णय घेऊन आपापल्या राज्यातील व्यसन आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करायल हवा. महाराष्ट्रातील ‘बेगडी’ गुटखाबंदीपेक्षातरी हा निर्णय कितीतरी पटीने स्तुत्यच आहे. फक्त त्याची अंमलबजावनी योग्यरीतीने व्हायला हवी.

3 Comments