व्हेज कटलेटस्

साहित्य :-

१)      अर्धी वाटी उकडलेले हिरवे वाटाणे

२)     अर्धी वाटी फरसबीचे बारीक तुकडे

३)     अर्धी वाटी गाजराचे तुकडे

४)     एक वाटी कोबीचे तुकडे

५)    एक चमचा आल्याचे बारीक तुकडे

६)      एक चमचा लसूण बारीक चिरलेला

७)    एक टेबल स्पून कोथिंबीर बारीक चिरलेली

८)     एक टेबल स्पून पुदिना बारीक चिरलेला

९)      दोन चमचे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस

१०)  अर्धा चमचा साखर , चवीला मीठ

११)   अर्धा चमचा गरम मसाला , ३ पावाचे स्लाईस

१२)  बटरचा चुरा , पाव वाटी बेसन , तळायला तेल . 

कृती :-27-vegetable-cutlet-270812

१)      कोबी , वाटाणे , गाजर , फरसबी उकडून घ्यावी .  व पाणी काढून थंड करावीत .

२)     कांदा बारीक चिरून घ्यावा .  शिजलेला कोबी बारीक चिरून घ्यावा , वाटाणे जरासे कुस्करावे .  भाज्यातील पाणी मात्र साफ निघाले पाहिजे नाही तर मिश्रण पातळ होते .

३)     सर्व भाज्या टाकून भिजवलेला पाव घट्ट पिळून घ्यावा .  गरम मसाला , मीठ , आले , कोथिंबीर , लसूण , मिरची सर्व मिक्स करावे .  व्हिनेगर , साखर टाकावी .  ह्या मिश्रणाचे बटाट्याएवढे गोळे करावेत . 

४)     बेसन पीठ अर्धी वाटी पाण्यात मिक्स करून ठेवावे .  बटरचा थोडा थोडा चुरा पाटावर पसरावा .  कटलेटचा गोळा बेसनात बुडवून चुऱ्यात घोळवावा . 

५)    गोळ्याला सुरीने दाबून चपटा करून लांबट , बदामी , गोल कोणताही आकार दयावा . 

६)      कटलेटला सर्व बाजूने बटरचा चुरा लागला पाहिजे .  कटलेट पाव इंच जाडीचा ठेवावा . 

बटरचा चुरा लावल्या नंतर थोडा वेळ ठेवून मग तळावेत .  गुलाबी रंग होईपर्यंत  चुरचुरीत तळावेत

One Comment