व्हेज बिर्याणी
|१) अर्धा किलो फ्लॉवर , ३ ते ४ बटाटे
२) अर्धा किलो बासमती तांदूळ
३) चार मोठे कांदे , चार मोठे टोमाटो
४) थोडी कोथिंबीर , पुदिना
५) ५ ते ६ जर्दाळू , काजू
६) केशर , लिंबूरस
७) केवडा इसेन्स , पिवळा रंग
८) हळद , लाल तिखट
९) तेल किंवा तूप , खोबरे एक वाटी
१०) चवीनुसार मीठ .
गरम मसाला :-
१) एक चमचा जिरे , अर्धा चमचा शहाजिरे
२) दोन तुकडे दालचिनी , ५ ते ६ मिरी
३) दोन मोठी वेलची , दोन लहान वेलची
४) एक तमालपत्र , एक जायपत्री
५) पाव तुकडा जायफळ , एक चमचा खसखस
हा सर्व मसाला थोडा गरम करून पावडर करून ठेवणे .
वाटायचा मसाला :-
१) एक कांदा बारीक चिरून , एक इंच आले
२) ५ ते ६ लसूण पाकळ्या
३) एक मिरची टाकून अर्धी वाटी खोबरे वाटणे .
कृती :-
१) फ्लॉवरचे देठासकट मोठे तुकडे करावेत . कांदे पातळ उभे चिरून घ्यावेत . बटाट्याची साले काढून उभ्या फोडी कराव्यात . टोमाटो चिरून घ्यावे .
२) रिफाइंड तेल किंवा तूप घेऊन उभा चिरलेला कांदा कुरकुरीत तळून घ्यावा . काजू तळून घ्यावेत . जर्दाळू गरम पाण्यात टाकून नरम झाले की आतील बी काढून घ्यावी .
३) कांदा तळलेल्या तुपात टोमाटो टाकून चांगला परतून घ्यावा . फ्लॉवरचे तुकडे व बटाटे त्यात टाकून कुटलेल्या मसाल्यातील एक चमचा मसाला , अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा तिखट मीठ टाकावे .
४) फ्लॉवर व बटाटा शिजला की तळलेला कांदा कुस्करून त्यातील थोडा कांदा फ्लॉवरमध्ये टाकावा . खोबरे टाकावे .
५) एका लिंबाचा रस काढून त्यात थोडे केशर गरम करून टाकावे . केवडा इसेन्सचे ४ ते ५ थेंब टाकावेत . जर्दाळू टाकावेत .
६) लिंबाचे थोडे पाणी फ्लॉवरमध्ये टाकावे . फ्लॉवर , बटाट्याला थोडा रस्सा ठेवावा .
७) बासमती तांदळाचा मोकळा भात करून घ्यावा . भात करताना पाण्यात मीठ व थोडा पिवळा रंग टाकावा .
८) दोन मोठी वेलची , दोन तमालपत्र पाण्यात टाकावे . भाताला चांगला सुगंध येतो . भात अर्धा कच्चा शिजवून चाळणीवर उपसून ठेवावा .