व्हेज मख्खनवाला

साहित्य :-veg makhhanavala

१)      अर्धी वाटी गाजराचे तुकडे

२)     अर्धी वाटी फरसबीचे तुकडे

३)     अर्धी वाटी वाटाणा , दोन चमचे लाल ग्रेव्ही

४)     अर्धी वाटी पनीरचे बारीक तुकडे

५)    थोडेसे काजूचे तुकडे , एक कांदा बारीक चिरलेला

६)      एक टेबल स्पून तूप , दोन ओल्या मिरच्या

७)    एक चमचा आले बारीक चिरलेले

८)     एक चमचा कसूरी मेथी , एक चमचा क्रीम

९)      थोडी हळद , मसाला , साखर

१०)  अर्धा चमचा मावा , मीठ .

कृती :-

१)      तुपात कांदा , मिरची , आले टाकून चांगले परतून घ्यावे .  गाजर , फरसबी , वाटाणा उकडून घेऊन कांदयात टाकून परतून घ्यावे . 

२)     थोडीशी हळद , अर्धा चमचा गरम मसाला , चवीनुसार साखर व मीठ टाकावे . 

३)     दोन चमचे लाल ग्रेव्ही टाकावी .  अर्धा चमचा कसूरी मेथी बारीक करून टाकावी .  थोडे पाणी टाकून ढवळून घ्यावे . 

४)     मावा टाकावा , क्रीम टाकून ढवळून घ्यावे .  पनीरचे बरीक तुकडे , काजूचे तुकडे टाकून वरून कोथिंबीर टाकावी .

कसूरी मेथी करण्याची पद्धत :-

१)      दोन जुडया मेथीच्या घेऊन त्याची फक्त पाने काढून घ्यावीत .  पाने बारीक चिरून घरातच पंख्याखाली कागदावर मेथी पसरून ५ ते ६ दिवस सुकवावी . 

२)     मेथी चांगली सुकून कुरकुरीत झाली की बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी .  मेथी घरात सुकवल्याने मेथीचा रंग हिरवाच राहतो .  फ्रीजमध्ये ठेवल्यास ती वर्षभर टिकते . 

One Comment