व्हेज स्ट्यू
|१) गाजराचे गोल किंवा लांबट ७ ते ८ तुकडे
२) फरसबीचे मध्यम ७ ते ८ तुकडे
३) फ्लॉवरचे मध्यम ७ ते ८ तुकडे
४) ३ ते ४ मशरूमचे तुकडे
५) २ ते ३ कोबीचे तुकडे मध्यम , पाने वेगळी केलेली असावीत
६) बेबीकॉर्नचे तुकडे , सिमला मिरच्यांचे ७ ते ८ तुकडे
७) एक क्यूब चीज , दोन टेबल स्पून लोणी
८) दोन टेबल स्पून मैदा , ५ ते ६ मिरी
९) दोन लवंग , दोन दालचिनीचे तुकडे
१०) दोन तमालपत्र , बदियान चार तुकडे (चक्रीफुल)
११) चवीनुसार मठ .
कृती :-
१) मोठया कढाईत लोणी पातळ करून त्यात लवंग दालचिनी , तमालपत्र , मिरी , बदियान टाकून सर्व भाज्या परताव्यात .
२) त्यात दोन वाटया पाणी टाकून अर्ध्या कच्च्या भाज्या शिजवून घ्याव्यात .
३) पाण्यात मैदा मिक्स करून ते पाणी टाकावे . उकळी आणावी . चवीला मीठ टाकावे .
४) स्ट्यू जास्त जाड वाटला तर पाणी टाकावे . मध्यम असावा . वरून चीज किसून टाकावे .