शर्ट निवडताना

shirtsदासरा झाला कि आता दिवाळीची खरेदी सुरु होईल . तरुणांना आता स्टायलिश राहण्याची सवय झाली आहे . काही लोक खरेदी खूप विचार पूर्वक करतात आणि करायला हि हवी  . त्यादृष्टीनं काही टीप्स महत्त्वाच्या ठरतील असे मला वाटत .शर्ट निवडताना व्यक्तिमत्त्वाचा विचार करावा ही जाणीव जागृत होत आहे.. शर्ट व्यक्तिमत्त्वाला साजेसा असावा. बाजारात वेगवेगळ्या बनावटीचे, पिंट्रचे आणि फॅशनचे शर्ट मिळतात. मात्र अंगकाठी, वय आणि वर्ण लक्षात घेऊनच शर्ट योग्य. कमी उंचीच्या पुरुषांनी उभ्या लाईनिंगचे शर्ट वापरणं योग्य ठरते. शर्टबरोबर टाय वापरत असाल तर उभ्या लाईनिंगच्या शर्टवर अरुंद टाय वापरणं चांगलं. यामुळे उंची थोडी जास्त भासते आणि लक्ष अशा प्रावरणांकडे खेचलं जातं. याउलट उंच पुरुषांनी हॉरिझन्टल लाईनिंगचे पिंट्र असलेले शर्ट वापरणं चांगलं. त्यामुळे उंची आणि रुंदी यांचं संतुलन साधलं जातं. उंच व्यक्तींनी स्लिम फिट शर्ट वापरणं सर्वात चांगलं. बेल्ट आणि पँटचा रंग शर्टला कॉन्स्ट्रास्ट असावा. यामुळेही उंची कमी भासते. किरकोळ शरीरयष्टी असेल तर आडव्या लाईनिंगचे शर्ट वापरणं उपयुक्त ठरते. यामुळे खांदे अधिक रुंद दिसतात. अशा पुरुषांना चेक्सचा पर्यायदेखील योग्य आहे.